🕒 1 min read
मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षति होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.
याच मुद्द्यावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’नावावरील विश्वास उडेल,’ असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
या संदर्भात बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की ‘मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ‘online’ बघता येणार नाही,’थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’नावावरील विश्वास उडेल,’ अस बाळा नांदगावकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:-
- प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनाही झाली कोरोनाची लागण
- हा तर कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण
- भारताला पहिला ‘ऑस्कर’ मिळवून देणाऱ्या भानू अथैय्या यांचे दुःखद निधन
- ‘पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही’
- पोलिसांवर हात उचलणाऱ्या यशोमती ठाकूर म्हणाल्या,’शेवटी सत्याचाच विजय होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
