मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, पहिला टप्पा मतदानाची तारीख 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
आता सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली असून कोरोनाचा धोका बघता याचा परिणाम प्रचार सभा, यात्रा यावर देखील होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह एकूण ३९ स्टार प्रचारकांची फौजच तयार केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी –
- शरद पवार
- प्रफुल्ल पटेल
- सुनील तटकरे
- के. के. शर्मा
- सुप्रिया सुळे
- नबाव मलिक
- नरेंद्र वर्मा
- राजीव कुमार झा
- राजेंद्र जैन
- सच्छिदानंद सिंग
- ब्रिजमोहन श्रीवास्तव
- के.जे.जोसेमन
- डॉ. फौजिया खान
- धीरज शर्मा
- सोनिया दुहान
- शब्बीर अहमद विद्रोही
- पुष्पेंद्र मलिक
- सीमा मलिकविरेंद्र सिंग
- गोविंदभाई परमार
- चौधरी वेद पाल
- उमा शंकर यादव
- एस.पी. शर्मा
- मुरली मनोहर पांडे
- राहत कादरी
- जितेंद्र पासवान
- ललिता सिंग
- संजय केशरी
- इश्तिक आलम
- अकबर अली
- मनोज जैस्वाल
- खुश्रो आफ्रिदी
- ब्रिज बिहारी मिश्रा
- शकील अहमद
- अझहर आलम
- इंदु सिंग
- चांद बाबू रहमान
- चंद्रेश कुमार
- चंद्रशेखर सिंग
- विरेंद्र सिंग
महत्वाच्या बातम्या :
- रियाची गाडी फॉलो केली तर कडक कारवाई करण्याची मुंबई पोलिसांची तंबी
- हाथरस घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरण रचून आंदोलन
- राज्यात अमर, अकबर, अँथोनीचे सरकार असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल : रावसाहेब दानवे
- ‘लोकशाही विरोधात कट रचणारा खरा मास्टरमाइंड शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करा’
- रामदास आठवलेंची खडसेंना रिपाइंमध्ये येण्याची खुली ऑफर, म्हणाले…

