🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या रिया चक्रवर्तीला सीबीआय, ईडी, एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.
यानंतर ड्रग्ज प्रकरणी तिचा हात असल्याचे काही पुरावे मिळाल्यानंतर एनसीबीने कडक कारवाई करत शोविक चक्रवर्ती नंतर रिया चक्रवर्तीला देखील अटक करण्यात आले होते. यानंतर न्यायायाने तिला कोठडी सुनावली होती. तर, आज रियाला आणखी एक धक्का बसला असून न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे रियाला आणखी काही दिवस जेलमध्येच राहावे लागणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. काही दिवसांपूर्वी रियाला अटक झाली असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षांनी अधीर रंजन चौधरी यांनी रियाला समर्थन दिले आहे. चौधरी यांनी बंगाल काँग्रेसची धुरा आपल्या कडे आल्यानंतर त्यांनी हा आक्रमक मुद्दा उचलला आहे. रियाची बाजू घेतानाच त्यांनी रिया ही ‘बंगाली ब्राह्मण महिला’ असल्याचं म्हटलंय. सुशांतला न्याय मिळवून देण्याची व्याख्या, बिहारसाठी न्यायाची व्याख्या असायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या:-
असं असेल मुंबई ईंडीयंसच्या सामन्यांचं वेळापत्रक
‘गुड बाय नागपूर’ – तुकाराम मुंढे झाले भावुक; म्हणाले…
बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
