🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते, अशी वक्तव्य केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अहमदनगरमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतच्या तोंडी आलेली अरे-तुरे ची भाषा सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून गेली आहे. मुख्यमंत्रिपदाचा सरळ सरळ अवमान करण्याची ही गुर्मी कंगनाला आली कुठून? मुख्यमंत्रिपद हे एखाद्या पक्षाचं नसतं. ते महाराष्ट्राचं असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अवमान, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे असे मत प्रशांत गडाख यांनी व्यक्त केले आहे.
प्रशांत गडाख पुढे म्हणाले, कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहेच आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी आजवर राज्य सरकारनेच पार पाडली. असे असताना तिने महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला. आणि आता केंद्राने तिला सुरक्षा देऊ केल्यावर मात्र तिने देशाचे अभिनंदन केले. नेमकं देशाचं अभिनंदन करून ती भारतापासून महाराष्ट्र वेगळा धरते का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. असे गडाख म्हणाले.
महाराष्ट्राबाहेरून येथे येऊन व्यावसायिक यश आणि नावलौकिक मिळविलेल्यांची संख्या मोठी आहे. इतरही राज्यांतून अनेक जण इथे आले. त्यांनी महाराष्ट्र व मुंबई आपली कर्मभूमी मानली व त्याचा ते अभिमानही बाळगतात. पण त्यातील काही फुटकळ लोकांकडून महाराष्ट्राचेच उलटे पांग फेडण्याची प्रथा नवी नाही. कंगना आणि अर्णब हे त्याच यादीतील नवे मोहरे आहेत. असेही गडाख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:-
भविष्यात विखे कुटुंब पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसले, तर नवल वाटायला नको- हेमंत ओगले
‘शिवसेना बदनाम हुई, डार्लिंग सत्ता के लिये’
मुंबई पोलीस कंगनाची ड्रग्ज संबंधी कसून चौकशी करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
