ब्रम्हपुरी : गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढत होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, पिंपळगाव (भोसले) रानमोचन, परडगाव व अनेक गावात पाणी शिरले आहे तर आवळगाव येथेही पुलावर पाणी चढल्याने गांगलवाडी ते मुडझा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान लाडज गावाला पुराच्या पाण्याचे वेढले असून तेथील नागरिक गावातच अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरला पाचारण केले आहे.
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी लागतच्या गावात पाणी शिरले आहे तर काही ठिकाणी छोटे मोठे नाले भरल्यामुळे शेतातही नदीचे पुराचे पाणी घुसले असल्याने धान पिक बुडाली आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावात वैनगंगा नदीचे पुराचे पाणी शिरले आहे तर देऊळगाव ते कोल्हारी नाल्यावर पूर आल्याने मार्ग बंद झाला असून धान शेती पाण्याखाली आली आहे.
सोयाबीनच्या पिकावर कोणी केले आक्रमण, खासदार भावना गवळींचे सर्वेक्षणाचे निर्देश
तसेच तालुक्यातील मुडझा मार्गावरील आवडगाव पुलावर पाणी चढल्याने गांगलवाडी मुडझा मार्ग बंद झालेला आहे वैनगंगा नदीला पाणी झपाट्याने वाढत असल्याने नाल्याना दाब येत असल्याने वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी नाल्यांद्वारे नदीकाठा लगत असलेल्या गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोठी बातमी: मोजक्या वारकऱ्यांसह प्रकाश आंबेडकरांना मंदिरात प्रवेश मिळणार?


