Share

मोठी बातमी: मोजक्या वारकऱ्यांसह प्रकाश आंबेडकरांना मंदिरात प्रवेश मिळणार?

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी आता भाजपा पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेतर्फे राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी आंदोलन पुकारले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसह वारकऱ्यांना सोबत घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

पंढरपूरात पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आहे. शिवाजी चौकात वंचितचे कार्यकर्ते व वारकरी मोठ्या प्रमाणात जमले असून पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात केला आहे. “पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.”  असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते.

पुणे-अहमदनगर महामार्ग होणार सहापदरी !

दरम्यान, आता प्रकाश आंबेडकर यांच्यासह मोजक्या वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे एक लाख वारकऱ्यांना सोबत घेऊन मंदिर प्रवेश करण्याची घोषणा मात्र हवेतच विरली आहे. भाजपाच्या २९ ऑगस्टच्या घंटानाद आंदोलनावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली असून आंदोलन करण्यापेक्षा केंद्रात जाऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला देखील दिला.

ठाकरे सरकारमध्ये ‘काँग्रेस’ला कोणी विचारत नाही : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!