Share

शरद पवार यांनी एक फोन केला तरी के. के. रेंजचा प्रश्‍न निकाली निघेल- बाळासाहेब थोरात

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : के. के. रेंजच्या जमीन हस्तांतरास राज्य शासनाचा तीव्र विरोध असल्याचे सांगत याप्रश्‍नी शरद पवार यांनी एक फोन केला तरी जमीन हस्तांतराचा प्रश्‍न निकाली निघेल. तसेच याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल, वन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येणार असून लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.

या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही या भूमीकेवर आपण ठाम आहोत. या प्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांची भेट घेऊन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याजवळ जमीन हस्तांतरणास ठाम विरोध दर्शविला जाईल. शासनाने लष्करास इतर ठिकाणची जमीन हस्तांतरीत करण्याचा पर्याय निवडावा असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके यांचे प्रतिनिधी अ‍ॅड.राहुल झावरे, कामगार नेते दत्ता कोरडे, राजू रोडे यांची बुधवारी मंत्रालयात के. के. रेंजप्रश्‍नी बैठक पार पडली. यावेळी मंत्री तनपुरे व अ‍ॅड.राहुल झावरे यांनी महसूलमंत्री थोरात यांना जमीन हस्तांतर प्रकरणी सुरू असलेल्या हालचालींची माहीती दिली.

आयुक्तांची ती भुमिका दुर्दैवी……जाणून घ्या नागपूरच्या महापौरांची प्रतिक्रिया

विनायक मेटेंमुळेच मराठा आरक्षणावर धोका निर्माण झाला असता ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा गंभीर आरोप

साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते ; चव्हाणांवर सामनातून घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!