Share

तलाठी व कोतवालांनाही विम्याचे कवच आ.लंके यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर कोरोना समितीध्ये तलाठी व कोतवाल यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे तलाठी व कोतवाल संवर्गातील कर्मचार्‍यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा सुरक्षा कवच देण्यासंदर्भात महसूल विभागाने विविध विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून माहिती मागविली आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून या कर्मचार्‍यांना विम्याचे कवच देण्याची मागणी केली होती.

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांचा शासनाने 90 दिवसांसाठी 25 रूपयांचा विमा उतरवून त्यांना सुरक्षा कवच प्रदान केले आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल आ.लंके यांनी ठाकरे यांच्याप्रती पत्रामध्ये कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आमदार निलेश लंके यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल विभागास पुढील कार्यवाहीच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कक्ष अधिकारी र.धो.कटके तसेच दिनेश ढोक यांनी राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून तलाठी व कोतवाल संवर्गाची माहिती मागविली आहे. लवकरच त्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

अच्छा चलता हु दुवा मे याद रखना ….. गूड बाय तुकाराम मुंढे

आयुक्तांची ती भुमिका दुर्दैवी……जाणून घ्या नागपूरच्या महापौरांची प्रतिक्रिया

विनायक मेटेंमुळेच मराठा आरक्षणावर धोका निर्माण झाला असता ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!