Share

साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते ; चव्हाणांवर सामनातून घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेले अनेक दिवस काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत असलेले दुमत समोर आले होते. २०१७ मध्ये पक्षाला उभारी देण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपावण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात बहुमत मिळवून केंद्रात पुन्हा भाजपाने सत्ता स्थापन केली.

यानंतर, काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिकता स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच यावेळी त्यांनी, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी घराण्या-व्यतिरिक्त असावा असे देखील स्पष्ट केले होते.मात्र, तेव्हाची परिस्थिती बघता कार्यकारिणीने सोनिया गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे अशी विनंती केली. यानंतर हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांनी पदभार स्वीकारला होता.

विनायक मेटेंमुळेच मराठा आरक्षणावर धोका निर्माण झाला असता ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा गंभीर आरोप

दरम्यान, येत्या काही महिन्यात हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असल्याने पुन्हा एकदा पक्षांतर्गत हलचाली वाढल्या होत्या. काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे उघड झाले होते, यातील एक गट हा सोनिया गांधी यांनी पुन्हा आपल्या हाती सूत्रे घ्यावीत असा विचारांचा तर एक गट हा गांधी घराण्या व्यतिरिक्त अध्यक्ष असावा अशा विचारांचा होता.

आम्ही मुंढेंचे शत्रू नाही, पण आयुक्तांची ती भुमिका दुर्दैवी……जाणून घ्या नागपूरच्या महापौरांची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या जवळपास २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पत्र देखील लिहिले होते. या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील समावेश आहे. तर, सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी झालेल्या कार्यसमितीच्या वादळी बैठकीनंतर पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडेच सूत्रे सोपावण्यात आली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सोनिया गांधींविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

अच्छा चलता हु दुवा मे याद रखना ….. गूड बाय तुकाराम मुंढे

सामना अग्रलेख :

अहमद पटेल हे उत्तम ‘मॅनेजर’ किंवा ‘सल्लागार’ आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते. आता पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या ‘पत्रनेत्यां’ना कोणी रोखले आहे?

70 वर्षांच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतुतू, आट्यपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी असे या मंडळींना वाटते काय? दुसरे असे की, राहुल गांधी हे सक्रिय होतेच व त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकांत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालचे हल्ले झाले तेव्हा हे सक्रिय ‘पत्र पुढारी’ कुठे होते? अशी खरमरीत टीका सामनातून करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!