Share

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतले संघदर्शन, प्रथमच नागपूर दौऱ्यावर

Published On: 

नागपूर : कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांचे एकेकाळचे खास निकटवर्तीय राहिलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मार्चमध्ये भाजपात प्रवेश झाला. आज प्रथमच ते नागपुरात आले असून, आल्याबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानी देखील भेट दिली.

यावेळी सिंधिया म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांचे निवासस्थान लोकांसाठी प्रेरणादायी आहे. देशाप्रती समर्पित असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांनी सुरू केला. देशासाठी सेवा करण्याची ऊर्जा या स्थानातून मिळते.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी 20 आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. त्यानंतर भाजप सत्तेत येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सिंधिया यांना भाजपने राज्यसभा निवडणुकीत उभे केले. यात ते विजयी झाले होते.

यावेळी त्यांना काँग्रेसमधील नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन उठलेल्या गदारोळाबद्दल विचारले असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मी एक भाजप कार्यकर्ता आहे. यामुळे दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलणे योग्य ठरणार नसल्याचे सिंधिया म्हणाले. सिंधिया सायंकाळी साडेसहा वाजता संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटणार असल्याची सध्या चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या :

कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करा, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोरोना बाधित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

वंचित सह विश्व वारकरी सेनेचे विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!