Share

आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध धरणांचे जलपूजन!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अकोले तालुक्यातील विविध धरणांचा जलपुजन सोहळा आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते पार पडला. अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्याला वरदान ठरलेले अकोले तालुक्यातील आढळा धरणाचे जलपुजन करण्यात आले. सोमवारी सकाळी 9 वाजता धरणस्थळी जाऊन आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आढळा धरणाचे जलपुन केले.

अकोले तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. काही दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण भरले व काही दिवसांतच निळवंडे धरण भरले होते. या दोन्हीही धरणांचा जलपुजन सोहळा थाटामाटात आणी शेतकरी बांधवांच्या उपस्थित पार पडला. शेतकरी वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले आढळा,सांगवी,पाडोशी धरण भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये धरणांचे सुरक्षित अंतर ठेऊन शासकीय जलपुजन सोहळा पार पडला.

वंचित सह विश्व वारकरी सेनेचे विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन…

आढळा, सांगवी, पाडोशी ह्या धरणांच्या जलपूजन सोहळ्याला देवठाण गावच्या सरपंच रोहिणी सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक अध्यक्ष रवि मालुंजकर, जेष्ठ नेते दादापाटील वाकचौरे, मदन पथवे व देवठाण, हिवरगाव, डोंगरगाव, विरगाव, गणोरे, समशेरपुर, सावरगाव पाट, पाडोशी, सांगवी येथील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करा, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!