Share

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी फडणवीसांनी केल्या ‘या’ सुचना

Published On: 

नागपूर : कोरोनाच्या बाबतीत राज्याचा अथवा एकंदरीतच देशाचा आढावा घेतला असता, जम्बो कोविड केअर सेंटर फारसे प्रभावी ठरत नसल्याचे विधान करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. काय आहेत त्या  पाहूया…

सुरुवातीला नियंत्रणात असलेला कोरोना महिन्यात हाताबाहेर जाताना दिसतोय. या महिन्यात मृत्यूदर झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची चाचणी करण्याचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे सद्य:स्थितीत जवळपास तीन हजार चाचण्या होतात. ही संख्या पाच हजारांच्या वर नेण्याची गरज आहे. येणारा महिनाभराचा काळ नागपूरकरांसाठी धोक्याचा असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

कोरोनाच्या स्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आज नागपुरात आले होते. महानगरपालिकेत महापौर, आयुक्त, इतर अधिकारी आणि काही आमदारांशी त्यांनी यावेळी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नागपुरातील बाधितांची संख्या गेल्या १५ दिवसांत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर बाधितांची संख्याही वाढेल. या वाढलेल्या रुग्णांचे व्यवस्थापनदेखील योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. यात लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणात जाऊ शकतील. तरीडी कोव्हिड केअर सेंटरमध्ये व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता आहे. खासगी संस्थांसोबत मिळून असे काही कोविड केअर सेंटर तयार करावे लागतील की, जेथे ऑक्सीजन पुरवठा करणाऱ्या खाटा असाव्या सध्या जे कोविड रुग्णालय नाहीत, त्यांनाही या व्यवस्थेमध्ये प्रशासनाने जोडून घ्यावे. जेणेकरून मनुष्यबळाचा प्रश्नही निकाली निघेल. असे केल्यास येत्या २० ते २५ दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर आटोक्यात येऊ शकेल, असे फडणवीस म्हणाले.

लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणात राहू शकतील. अशा रुग्णांना उपचारांची तेवढी आवश्यकता नाही, जेवढी समुपदेशनाची आहे. खासगी डॉक्टरांची यामध्ये मदत घेता येऊ शकेल. मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉल कस्न दररोज दोन ते तीन तास रुग्णांचे समुपदेशन खासगी डॉक्टर करू शकतात, असेही फडणवीस म्हणाले.

विशेष म्हणजे या दौऱ्यात काही महत्त्वाच्या सुचना फडणविस यांनी दिलेल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनात एक गोष्ट लक्षात आली की, फार जम्बो केअर सेंटर्स अपेक्षित प्रभावी ठरलेले नाहीत. त्यापेक्षा लहान – लहान कोविड सेंटर उभारावे. यामध्ये रुग्णांचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केले जाऊ शकते. या पद्धतीची व्यवस्था नागपुरात उभारावी, अशा सूचना प्रशासनाला केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

राजेश टोपेंची शरद पवारांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती

लवकर बरे व्हा, रोहित पवारांच्या निलेश राणेंना सदिच्छा

फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही – राजू शेट्टी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!