Share

पुणे महापालिकेचा अजब कारभार तब्बल सव्वा पाच लाख रुपयांना खरेदी करणार एक झाड ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या दबावातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी येथील पुनावाला उद्यानात वृक्षारोपण करण्याकरिता तब्बल सव्वा पाच लाख रुपयांना एक वृक्ष खरेदी करण्याचे टेंडर काढले आहे.

या टेंडरच्या माध्यमातून फक्त ६५ वृक्ष खरेदी केले जाणार असून त्याची किंमत तब्बल ३ कोटी त्रेचाळीस लाख पन्नास हजार एवढी आहे. सन २०१८ साली या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. त्यामूळे सध्या या कामाची मुदत संपली असताना वृक्ष खरेदी का करायची आहे. हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवाय टेंडरची तब्बल २ वर्षाने मान्यता घेतली जाते हे कोणता नियमात बसते, असा ही प्रश्न विरोधक विचारत आहेत. या विषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यानी बेकायदेशीरित्या सव्वा पाच लाख रुपयांना खरेदी केल्या जाणा-या वृक्ष खरेदी प्रकरणावर आक्षेप घेतले आहेत.

सुप्रिया सुळेंना टक्कर देणाऱ्या कांचन कुल यांच्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

या विषयी बोलताना नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, "या वृक्षांची महानगरपालिकेच्या दरसुचीमध्ये (डीएसआर) मध्ये नोंद नाहीत तसेच इस्टीमेट समितीची मान्यता नसताना हे टेंडर कोणाच्या दबावाखाली काढण्यात आले आहे. २ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे मूळ टेंडर असताना टेंडर दरापेक्षा ८५ लाख रुपयये जास्त दराने हे टेंडर आले आहे. टेंडर दर वस्तुस्थिती व बाजार भावाशी सुसंगत नसल्याचे उद्यान विभागाने म्हंटले असताना हे टेंडर मान्यतेसाठी पाठविण्या बाबत सत्ताधारी भाजपाचे नेते प्रशासनावर दबाव टाकत आहेत. महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून वाढीव दरांची टेंडर येण्याचे सत्र थांबायला तयारच नाही. महानगरपालिकेत भाजपच्या काळात भ्रष्ट्राचार शिगेला पोहचला आहे. महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचाराबाबत सत्ताधारी भाजपाचा खास मानपत्र देऊन शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार करायला हवा. आता एवढेच राहिले आहे.

भाजपाच्या नव्या जबाबदारीची यादी जाहीर; गोपीचंद पडळकर यांच्यासह धनंजय महाडीक यांना मिळाले मोठे पद!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!