दौंड : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना कडव आव्हान देणाऱ्या दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. कांचन कुल यांची पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे जवळपास दीड लाख मतांची आघाडी घेत भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळेंच्या या विजयाने बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं होतं. या मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती. मात्र, नंतर त्या मोठ्या प्रमाणात पिछाडीवर पडल्या आणि त्यांचा पराभव झाला.
फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही – राजू शेट्टी
दरम्यान, गेल्या वर्षीच भाजपवासी झालेले विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे प्रवक्ते करण्यात आलं आहे. तसंच गेल्याच वर्षी भाजपवासी झालेले धनंजय महाडिक यांच्यावरही पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीचं शेवटच्या क्षणी तिकीट मिळवणारे राहुल नार्वेकर यांनाही प्रवक्तेपद देण्यात आलं आहे. भारती पवारही गेल्याच वर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये आल्या होत्या. त्या नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याकडेही भाजपकडून जबाबदारी सोपवली आहे.
भाजपाच्या नव्या जबाबदारीची यादी जाहीर; गोपीचंद पडळकर यांच्यासह धनंजय महाडीक यांना मिळाले मोठे पद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

