🕒 1 min read
मुंबई : मागील महिन्यातच केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ता पदी निवड करण्यात आली होती. आता, लोकसभेत विरोधात प्रचार करणारे मात्र ऐन विधानसभेवेळी भाजपात येऊन थेट बारामतीमध्ये अजित पवारांना आव्हान देणाऱ्या गोपीचंद पडळकरांना देखील मोठी जबाबदारी दिली आहे. याआधी देखील, गोपीचंद पडळकर यांना असलेला धनगर समाजाचा पाठिंबा बघता विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. पडळकरांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच, लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार धनंजय महाडीक यांची देखील पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये थेट अजित पवारांना बारामतीमध्येच आव्हान दिले होते. त्यानंतर, फडणवीसांच्या या ढाण्या वाघाचे डिपॉजिट देखील जप्त झाले होते.
फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही – राजू शेट्टी
राज्यातील विभागवार प्रवक्ते पदांची आज नियुक्ती करण्यात आली आहे, त्यानुसार खा.भारती पवार – उत्तर महाराष्ट्र, आ.गोपीचंद पडळकर आणि धनंजय महाडीक – पश्चिम महाराष्ट्र, आ. राम कदम – मुंबई, शिवराय कुलकर्णी – विदर्भ, एजाज देखमुख – मराठवाडा, भालचंद्र शिरसाट – मुंबई, राम कुलकर्णी – मराठवाडा, श्वेता शालिनी – पुणे, ऍड. राहुल नार्वेकर – मुंबई यांची निवड करण्यात आली आहे.
‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात ऐरणीवर,तरीही राज्य सरकार ढिम्मचं’
यासोबतच, पॅनेलिस्ट म्हणून गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी यांची निवड करण्यात आल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.
शेतकरी-पशुपालक बांधवांनी यावर्षीचा पोळा साधेपणाने साजरा करावा – धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

