नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर, आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच आहेत.
राजेश टोपेंची शरद पवारांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती
रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्याच्या मेंदूत एक मोठी गाठ आहे, ज्यासाठी त्यानी आपत्कालीन व्हेंटिलेटर शस्त्रक्रिया केली. पण या शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे.डॉक्टरांची विशेष टीम सतत माजी राष्ट्रपतींच्या आरोग्याची काळजी घेत आहे. गेले अनेक दिवस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे व्हेंटिलेटर सहाय्यावर आहेत. तर, त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.
मूर्ती विक्रेत्यांना फिरत्या गाड्यावर घरोघर जाऊन गणेश मूर्ती विकण्यास परवानगी


