कोल्हापूर : राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.
तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सबंध भारतासाठी ऊर्जास्रोत असलेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर आज सकाळी भेट दिली. तर, तब्बल २० वर्षांनी पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल हे शिवनेरी किल्ल्याच्या दौऱ्यावर आले आहेत.. प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतील, यानंतर संपूर्ण गडाची पाहणी देखील केली,
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा पद्धतीनं पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण चकित झाले आहेत. यावेळी ‘यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है,’ असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटल्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
‘तरुण’ मुख्यमंत्री घरात तर ‘जेष्ठ’ राज्यपाल चालत शिवनेरी किल्ल्यावर…
राज्यपालांच्या या किल्ले शिवनेरी भेटीवर खासदार संभाजीराजे यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी ‘पायी’ सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन मोहिमेत सरकार ने शिवप्रेमींना सहकार्य करून पाठिंबा द्यावा ही अपेक्षा नेहमीच केली गेली. त्यामुळे राज्यपालांनी जो प्रत्येक मंत्र्याला गड दत्तक घेण्याची सूचना केली ती रास्त आहे. अस संभाजीराजे म्हणाले आहेत.
राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेट ची एक बैठक रायगड वर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल. स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल. अस देखील संभाजीराजे म्हणाले आहेत.
शिवछत्रपतींना नमन करण्यासाठी राज्यपालांची कठीण यात्रा महाराष्ट्रातील युवकांना प्रेरित करेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

