Share

‘तरुण’ मुख्यमंत्री घरात तर ‘जेष्ठ’ राज्यपाल चालत शिवनेरी किल्ल्यावर…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सबंध भारतासाठी ऊर्जास्रोत असलेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर आज सकाळी भेट दिली. तर, तब्बल २० वर्षांनी पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल हे शिवनेरी किल्ल्याच्या दौऱ्यावर आले आहेत.. प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतील, यानंतर संपूर्ण गडाची पाहणी देखील केली,

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा पद्धतीनं पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण चकित झाले आहेत. यावेळी ‘यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है,’ असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटल्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

राज्यपालांच्या या किल्ले शिवनेरी भेटीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी राज्यपालांचे कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘तरुण’ मुख्यमंत्री घरात तर ‘जेष्ठ’ राज्यपाल चालत शिवनेरी किल्ल्यावर. अस ट्विट करत अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्ताला आज फार गर्व होत आहे. राज्यपाल, जे आपल्या राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी ही कठीण यात्रा केली. त्यांचा श्रद्धाभाव महाराष्ट्रातील युवकांना सदैव प्रेरित करेल. अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!