Share

‘ते’ वक्तव्य संजय राऊतांना भोवणार, इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं, असं वक्तव्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. या वक्तव्यावरून आता चांगलच राजकारण पेटायला सुरवात झाली आहे. डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत राऊत यांनी माफी मागावी या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की, ‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’

फेसबूक आणि व्हॉट्सऍपवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण…

दरम्यान, या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून, संजय राऊतांवर भाजपनं टीकाही केलीय. ‘कोरोनाच्या संकटात डॉक्टर देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असं विधान करणं म्हणजे डॉक्टरांचा मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज्यासह देशातील सर्व डॉक्टरांची माफी मागावी,’ अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.

‘बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्यामुळे महाराष्ट्र भाजपला दुःख’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!