Share

कोरोनाच्या काळात आंदोलनं करताना लाज वाटायला पाहिजे – हसन मुश्रीफ

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : ‘ज्याचा अनुभव नाही अशा आजाराशी राज्यातील महाविकास आघाडीपासून ते अगदी परिचारिका, ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वजण जीवाची बाजी लावून सामना करत आहेत. अशावेळी फसवी आंदोलने करणाऱ्या विरोधकांना लाज वाटायला पाहिजे,’ अशा शब्दात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही, मात्र त्यांचे मुहूर्त चुकत असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपाची सुरुवात कोल्हापुरात करण्यात आली. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘विरोधकांनी जरा PPE किट घालून काम करून पाहावं आणि जरा बिळातून बाहेर यावं. लोकशाहीमध्ये आंदोलनं हवीत, पण ही ती वेळ नाही,’ असंही मुश्रीफ म्हणाले.

आज देशात मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे का ? – सोनिया गांधी

दरम्यान, दुसरीकडे अडचणीच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराचा मुकाबला करताना आपण एकत्रितपणे त्याला सामोरे जात आहोत. या संकटाचा अहोरात्र सामना करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, सर्व आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आर. आर. आबांच्या आठवणी ताज्या; जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ – अजित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!