Share

ये दोस्ती हम नही छोडेंगे… धोनी पाठोपाठ सुरेश रैनाने देखील केली निवृत्तीची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. धोनीने आपल्या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की संध्याकाळी 7.29 पासून त्याला निवृत्त समजले पाहिजे. शुक्रवारी धोनी आयपीएल चेन्नईला पोहोचला आणि शनिवारी तो जिममध्येही दिसला होता.

39 वर्षीय एम.एस धोनीने कसोटी क्रिकेट मधून यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा भाग होता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधारही होता. तसेच धोनीच्या नावाच्या बर्याच मोठ्या विक्रमांच्या नोंदी आहेत.

महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ आता त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, असं म्हणत, निवृत्ती जाहीर केली. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी हा अचानक बसलेला धक्का आहे.

सुरेश रैनाने 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 768 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक 7 अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने वन डे आणि टी 20 सामन्यांमध्ये चांगलीच चमक दाखवली होती. रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं, 36 अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/CD6d3QChY-V/?utm_source=ig_embed

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!