Share

राज्यात एका दिवसात कोरोनामुक्तांचा आकडा १० हजारां पार, तर नवे रुग्ण इतके…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेले ४ महिने कोरोनाने राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता गेल्या काही दिवसात एक दिलासा देखील मिळत आहे. दिवसेंदिवस नवे कोरोना रुग्णांची नोंद जरी वाढत असली तरी, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे.

काल दिवसभरात तब्बल १० हजार १४ (१०,०१४) रुग्ण बरे झाले असल्याने कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १० हजारा पार गेला आहे. काल हे दिलासादायक आकडे जरी समोर आले असले तरी संकट मात्र कायम आहे. राज्यात काल दिवसभरात ११ हजार ८८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हा आकडा देखील वाढता असून गेल्या काही दिवसातील उच्चांक आहे.

अनुसूचित जाती-जमातीचे पदोन्नतीचे आरक्षण कायम राहावे यासाठी पुण्यात निदर्शने

तर, काल २५६ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा हा १८ हजार ३०६ झाला असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ लाख ३५ हजार ६०१ झाला आहे. दरम्यान, मंगळवारी १० हजार १४ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. वाढत्या कोरोनामुक्त रुग्णांच्या आकड्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले आहेर तर, मृत्यूदर ३.४२ टक्के एवढा असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजत आहे.

भाजपचा लढवय्या ढाण्या वाघही अडकला कोरोनाच्या विळख्यात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!