Share

तहसीलदारांच्या पतीपासून मला वाचवा, राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांकडे धाव

Published On: 

राजगुरूनगर : खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असुन गुंड प्रवृत्ती आणि त्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.

तहसीलदार यांच्या बदलीवरून खेड तालुक्यात आमदार विरुद्ध तहसिलदार यांची लढाई आता विकोपाला गेला आहे. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलीस स्टेशनला समक्ष येऊन लेखी तक्रार केली आहे.

खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले नेमणूक झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे करीत आहेत. जमिनीच्या नोंदी, दाखले, रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करीत आहेत. तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली.

मात्र, हे केल्यावर तहसीलदारांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केली. त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे, असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन;लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!