🕒 1 min read
मुंबई: कोकणात गावी जाणारे चाकरमानी आणि गणेशोत्सव हे आता अनेक दशकांचं समीकरण बनलं आहे. यंदा मात्र, कोरोना महामारीच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता कोकणात जाता येणार कि नाही?, बाप्पाचे दर्शन मिळणार कि नाही? असे अनेक प्रश्न या चाकरमान्यांना भेडसावत होते. तर, गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येईपर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा केली जात नव्हती.
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांसह आंतरजिल्हा सार्वजनिक वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून आपल्या गावी जाणाऱ्या या गणेशभक्तांना खाजगी वाहने व ई-पाससाठी अव्वाच्या-सव्वा दर देऊन आर्थिक तोटा सहन करत गावी जावे लागत होते, तर गावी गेल्यानंतर क्वारंटाईन किती दिवस असणार याबाबत देखील संभ्रमता होती. यावरून विरोधकांनी देखील सरकारला अनेकदा घेरले होते.
‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’
तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र पुढाकार घेत या चाकरमान्यांसाठी नियमित दरात सर्वत्र मुंबईतून कोकणात जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्याचे ठरवले होते. त्यानुसार हजारो नागरिकांनी यासाठी बुकिंग केले असून आज सकाळीच या गणेशभक्तांना घेऊन काही बसेस कोकणासाठी रवाना झाल्या. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांना ३१ जुलै रोजी एका आंदोलनाप्रकरणी अटक झाल्यानंतर या उपक्रमाचे काय होणार असे सवाल उपस्थित होते. यावर, काल जाधव यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी कोकणात जाणाऱ्या गाड्या ठरल्याप्रमाणे जातील असं आश्वासन दिलं आहे.
भरमसाठ वीज बिले हा महावितरणचा घोटाळा;सामान्य माणसाच्या पैशावर मारला डल्ला
याचदरम्यान, विलंबाने का होईना पण राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील एक महत्वाची घोषणा केली होती, “गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात निघाले आहेत. त्यांनी 12 ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर त्यांना केवळ दहा दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच जे चाकरमानी एसटीने प्रवास करतील त्यांना ई-पासची आवश्यकता नाही,” असे अनिल परब म्हणाले. यासाठी, एसटीचे ४ ऑगस्टपासून ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आले होते.
‘संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा’
तसेच, “जे प्रवाशी एसटीने जातील, त्यांना ई-पासची गरज असणार नाही. मात्र इतर वाहनांनी जाणाऱ्यांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे. खासगी बस वाल्यांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटचं भाडे घ्यावे. जर याबाबतच्या तक्रारी आल्या तर कारवाई केली जाईल.” त्यामुळे या नियमावलीचा सर्व चाकरमान्यांना काही अंशी दिलासा मिळत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

