Share

शरद पवारांच्या पायाला पुन्हा भिंगरी, सोलापूर नंतर ८० वर्षाचा योद्धा नाशिकच्या दौऱ्यावर…

Published On: 

नाशिक : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे राज्याला अडचणीत पाहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पायाला भिंगरी लावत महाराष्ट्रभर दौरे करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. नाशिक शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे येत्या शुक्रवारी नाशिकला येत आहेत. यावेळी विविध घटकांशी चर्चा करतील. कोरोना कसा नियंत्रणात आणायचा, याविषयी नेमका कार्यक्रम तसेच दिशादर्शन यातून प्रशासनाला होईल. विशेषतः शरद पवार नाशिकला येणार असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास त्यातून वाढेल.

शरद पवार यांच्या समवेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील येणार आहेत. दुपारी दोनला त्याचे आगमण होईल. त्यानंतरचे नियोजन अद्याप निश्चित झालेले नाही. यापूर्वीच्या दौऱ्यात पवार यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेताना फक्त निवडक सूचना केल्या होत्या. त्यात कोरोना विषयक चाचण्यांची स्थिती, त्यात किती वाढ करावी, त्याची स्थिती, निष्कर्ष, मृकत्यूदर कसी कमी करता येईल, त्यासाठी नेमकेपणाने काय करावे, नागरीकांन ादिलासा मिळेल असे काय काय केले पाहिजे, यांसह प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आमन्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे सध्या कळीचा मुद्दा बनलेल्या नाशिकला ते येत आहेत. त्यामुळे अनेकांना या दौऱ्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वी पुणे, सोलापूरसह विविध भागातौदरा केला आहे. या भागात भेट देत त्यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे त्यांचा दौरा काम करणाऱ्या सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सेवाभावी कार्यकर्ते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही त्यातून नेमकेपणाने काम करण्याची दिशा मिळाली आहे. राजकीयदृष्ट्या देखील हा दौरा चर्चेचा विषय ठरला होता.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. कोरोनावरील उपाययोजनांबाबत शासन अतिशय गंभीरपमे काम करीत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी नाशिकला येत आहेत. कोरोनाविषयक आढावा घेऊन ते सगळ्यांना मार्गदर्शन करतील. नाशिककर कोरोनाला निश्चित पराभूत करतील. अशी छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भरती आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक व्हावी – नाना पटोले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!