Share

‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘जंगजौहर’चा टीझर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला विळखा घातला आहे. आता कुठे सुरु असलेला लॉकडोउन थोडा शिथिल करण्याचा प्रयत्न होत आहे. अनलॉकडाऊनमध्ये प्रत्येक क्षेत्र हळूहळू खुले होत आहे. मनोरंजन क्षेत्रानेही पुन:श्च हरिओम केले आहे. नियमांचे पालन करत टीव्ही मालिका आणि सिनेमांची शूटिंग सुरू झाली आहे. नुकतेच ‘जंगजौहर’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेता ऋषी सक्सेनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर केला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अंगावर काटा आणणारी अनेक दृश्य असल्याचं पाहायला मिळत आहे. पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. याची एक झलक या टीझरमध्ये दाखविण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/CCkbq7WnF-y/?utm_source=ig_embed

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करत असून अजय-अनिरुद्ध आरेकर हे निर्मिती करत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

#Corona: कोरोनाची लागण झाल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

सडक्या मेंदूच्या निर्लज्ज जोशुआचा तिव्र निषेध, भाजप नेता भडकला

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!