Share

आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर झाले ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये पडळकरांनी आगरकरांऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरला, त्यानंतर सोशल मीडियात याबाबत ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करत दुसरी पोस्ट केली.

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. नेटिझन्सने हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली, लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले? फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले आहे. यानंतर गोपीचंड पडळकर यांनी आगरकरांना अभिवादन करणारी पोस्ट टाकल्याचं दिसून आलं.

gopichand padlkar

मात्र मी माझ्या ट्विटरवर गोपाळ गणेश आगरकरांचा फोटो पोस्ट करत अभिवादन केले, मात्र राष्ट्रवादीच्या लोकांकडून जाणुनबुजून अशाप्रकारे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष वाढला होता, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे अशी जहरी टीका केली होती. त्यानंतर पडळकरांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे पुतळे जाळले होते, तर पडळकरांना मारण्याचीही धमकी दिली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!