Share

…मग संघाचा रेशीमबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित का झाला, कॉंग्रेस नेत्याचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : धारावीतील कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यात सुरु झालेला श्रेयवाद हा काही संपत नसल्याचं चित्र सद्या दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले होते. मात्र, भाजपा नेते चंद्रकांत पाटील, नितेश राणे यांच्यासह अनेक जणांनी याचे श्रेय RSS च्या स्वयंसेवकांना जाते असे स्पष्ट केले होते.

यानंतर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले होते. आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरून भाजप नेत्यांना खडे बोल सुनवले आहेत. ‘काही न करता श्रेय लाटण्याची प्रवृत्तीला संघप्रवृत्ती म्हणतात. कोरोना झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या अंतिम संस्कारापासून पळ काढणारे संघाचे लोक धारावीचे श्रेय घेतात तेव्हा त्यांनी नागपूरचा संघाचा रेशीमबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित का झाला? यांचे उत्तर द्यावे’. असा सवाल सचिन सावंत केला आहे.

#corona: चिंता वाढली; भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

दरम्यान, भाजपा नेते नितेश राणे यांनी हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केले होते. त्यांनी ट्विट केले होते की,”राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे.”, असे नितेश राणेंनी म्हटले होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचं म्हटलं होतं.

‘फडणवीसांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालावी, म्हणजे सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम दिसेल’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!