पुणे : पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जाहीर केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. पुणे शहरात आजपासून ( मंगळवार 14 जुलै) झालेला लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत कायम असणारं आहे. पुणे शहरातील रस्ते, पेठांचे भाग पोलिसांनी बंद केले असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.
पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत.
कोरोनाचा पाठलाग केल्यानेच लढा यशस्वी होईल – एकनाथ शिंदे
संपूर्ण पुणे शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. पेट्रोल पंप संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत.
…तर पुन्हा कडक लॉकडाऊन करणार, जयंत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
