Share

जगाने बघितलं, भारताने कोरोना विरोधात यशस्वी लढाई लढली – अमित शाह

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज केंद्रीय सशस्त्र दलाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केला. “कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत भारत चांगल्या स्थितीमध्ये आहे. आपण सर्वजण मिळून निर्धाराने, जोमाने कोरोना विरोधात लढू”. असं ते म्हणाले

पुढे ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे लढली आहे. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. भारत कोरोना विरुद्ध लढाई कसा लढणार? अशी अनेकांच्या मनात शंका होती. पण आज जग पाहतेय, भारताने कोरोना विरुद्ध यशस्वी लढाई लढली आहे’.

“कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आपण निर्धाराने कोरोना विरोधात लढाई सुरु ठेवू. घाबरुन जाण्यासारखी स्थिती नाही. कोरोनाला पराभूत करण्याची लढाई आपण जोमाने लढू” असे शाह या कार्यक्रमात सीएपीएफच्या प्रमुखांना संबोधित करताना म्हणाले.

गणेशोत्सव मंडळांसाठी कडक नियमावली! गणेशभक्तांना मंडपात प्रवेश बंदीच

‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’

भारताला मोठं यश ! १५ ऑगस्टला येणार ‘मेड इन इंडिया’ कोरोना लस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!