🕒 1 min read
पुणे : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहर देखील कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरात १३ ते 23 जुलै असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला. कडक लॉकडाऊन जाहीर करण्याच्या निर्णयामुळे रविवारी पहाटेपासून मार्केटयार्ड परिसरात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी नागरिकांनी भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
लाॅकडाऊनच्या धास्तीने रविवारी पहाटे 3 वाजल्या पासूनच मार्केट यार्डात किरकोळ विक्रेत्यासह पुणेकरांनी देखील प्रचंड गर्दी केली.गर्दी एवढी प्रचंड प्रमाणात होती की बाजार समिती प्रशासन व पोलिसांना देखील नियंत्रण करणे शक्य झाले नाही. सर्वसामान्य नागरिकांना बाजार आवारात बंदी असताना एकाच वेळी झालेल्या गर्दीमुळे प्रशासन हतबल झाले व नागरिकांनी जबरदस्तीने गेट उघडून बाजार आवारात प्रवेश केला.
दरम्यान एकाचवेळी हजारो लोकांनी बाजार आवारात प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला. कोरोनाची भिती, सुरक्षित सामाजिक अंतर, मास्क सर्व नियम धाब्यावर बसवले गेले.
पुण्यातील लॉकडाऊनला केला ‘या’ संघटनेने विरोध!
परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?
महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढला,या गोष्टीवर असणार निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

