🕒 1 min read
हैदराबाद: कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिका वेळेत न आल्याने अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोरोना रुग्णांची अनेक हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणखी एक चित्र समोर आले आहे.
तेलंगणाच्या निजामाबाद शहरात कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत नेण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच नेण्यात आला. खरं तर, रुग्णालयाने 50 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना स्वाधीन केला. रुग्णालयाने मृतांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका सुविधा देखील पुरविली नाही. एएनआयशी बोलताना निजामाबाद शासकीय रुग्णालयातील नागेश्वर राव म्हणाले, “मृत व्यक्तीचे कुटुंब रुग्णालयातच काम करतात आणि त्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.” सदर वृत्त ANI ने समोर आणले आहे.
‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’
Telangana: Body of a #COVID19 patient taken to a burial ground in an auto-rickshaw from Nizamabad Government Hospital. Dr N Rao, Hospital Superintendent says, "Deceased person's relative who works at the hospital asked us for the body. He didn't wait for an ambulance." (10.07.20) pic.twitter.com/IKhHh3zkbb
— ANI (@ANI) July 12, 2020
राव पुढे म्हणाले की, ‘मृत व्यक्तीच्या कुटुंबाने एका युवकाच्या मदतीने मृतदेह ऑटो रिक्षात नेला. दुसरा तरुण आमच्याच हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. नागेश्वर राव पुढे म्हणाले की, ’50 वर्षीय रूग्णाला 27 जून रोजी निजामाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते कोविड पॉझिटिव्ह होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.’ दरम्यान, कोरोना रुग्णाच्या मृत्यू नंतर अत्यंत खबरदारीने मृतदेहाचे अंतिम संस्कार करणे अपेक्षित असताना हि बाब धक्कादायक आहे.
‘महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळेचा मेंदू गुडघ्यात आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

