Share

अमिताभ नंतर मुलगा अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली झाली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिलीय. तर त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची देखील टेस्ट करण्यात आली असून त्यात अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, अभिनेत्री जया बच्चन, आणि अभिषेख यांची मुलगी अराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर ‘माझ्या संपर्कात मागील 10 दिवसांत जे लोक आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन अमिताभ यांनी केली आहे.

दरम्यान, अभिषेक बच्चन याने ‘आज माझी आणि माझ्या वडिलांची म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्हा दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीही करोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो आहे’. अस ट्विट करत आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वी कवितेतून सांगितल होतं, ‘वक्त ही तो है… गुजर जायेगा’!

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. अमिताभ बच्चन यांना ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. कोरोनामुळे हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या १२ व्या सीझनचे सूत्रसंचालन करणार होते. मे महिन्यात यासाठीच्या ऑडिशन होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला होता. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरा’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ हे चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

धोका वाढला : महाराष्ट्रात २४ तासांत रेकोर्डब्रेक ८१३९ नवीन रुग्णांची वाढ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!