Share

बच्चू कडू आक्रमक, …तर ‘त्या’ शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश

Published On: 

अकोला : खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

यासंदर्भात अकोला येथे पालकांचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी पालकांनी तक्रारीचे निवेदन देऊन संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी शाळांकडूनच किंवा शाळेने नेमून दिलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते, याबद्दल आपली व्यथा मांडली.

धोका वाढला : महाराष्ट्रात २४ तासांत रेकोर्डब्रेक ८१३९ नवीन रुग्णांची वाढ

संबंधित पालकांना आश्वस्त करताना बच्चू कडू म्हणाले, शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ती करु शकत नाही. तसा त्यांना अधिकार नाही. आपल्या पाल्यासाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या पुस्तके, प्रयोग वही इ. तसेच अन्य साहित्य हवे तेथून घेऊ शकतात. पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही वेळचे वेळी आढावा घेऊन पालकांच्या तक्रारींचे निराकरण करावे,असे निर्देश बच्चू कडू यांनी दिले.

शिवसेनेचे आमदार पवारांमुळे कसे निवडून आले याचं उत्तर पवारांनी द्यावं – सुधीर मुनगंटीवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!