Share

छत्रपती खाली बसणार असतील तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या ‘सारथी’ संस्थेबाबतचे वाद शमता शमत नाहीत. आज या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांतीचे समन्वयक व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक आयोजित केली गेली होती.

मात्र, या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याने स्वतः खासदार छत्रपती संभाजी राजे यांना मी बाहेर जाऊ का असे उद्गार काढावे लागले. सारथी व मराठा समाजातील अनेक प्रश्नांवर हि बैठक मंत्रालयात आयोजित केली गेली होती. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांना मंचावर न बसवता तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समन्वयकानी नाराजी व्यक्त केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

छत्रपती खाली बसणार असतील तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं असा भावनिक प्रश्न उपस्थित करून मंचावर बसण्याची विनंती समन्वय समितीतील सदस्यांनी केली, जेणेकरून कोणताही वाद निर्माण होणार नाही. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत विनम्रपणे मी एक सदस्य म्हणून या बैठकीला आलो आहे व मान-अपमासाठी आलो नसून सारथीवरील प्रश्नांवर दाद मागायला आलो आहे असे देखील सांगितले.

दरम्यान, या बैठकीतील या गोंधळ थांबला असून बैठक सुरळीतपणे सुरु आहे. खुद्द छत्रपतींनी हा वाद थांबवण्यासाठी मान-अपमान न करता सर्वांना शांत केले. सारथी संदर्भात विशेष आमंत्रित असून हि बैठक महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तर, व्यासपीठावर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह उच्च अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टिकटॉक बंदी नंतर इंस्टाग्रामने आणले नवीन फिचर

‘नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!