Share

‘जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय? मेटेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली.

वीज बिल दरवाढ रद्द करण्यासाठी भाजपाचे ठाणे शहरात जोरदार आंदोलन

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या प्रार्थनेवरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय? विठ्ठल सगळं करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनी सरकारवरून पाय उतार व्हावं. हे निराशावादी सरकार आहे. त्यांनी सगळं देवावर सोडलं आहे. त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

पावसाळ्यातील विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

‘महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि काळजी घेण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे. या काळात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारने खाजगी रुग्णालय ताब्यात घ्यावी. त्यांनी चाचण्या कमी केल्या आणि रुग्ण संख्या कमी दाखविण्याकडे जास्त लक्ष दिलं आहे,’ अशीही टीका विनायक मेटेंनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!