Share

मातोश्रीवरील बैठक संपली ; कॉंग्रेस नेत्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश

Published On: 

मुंबई : विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट मातोश्रीवर भेट घेतली. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चक्क आठवडा उलटून गेला आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य – अजित पवार

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता” असं बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.

“विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केलं जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरलं होतं. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक विषय नाही” असं थोरातांनी सांगितलं.

राज्यात कोरोनाचे थैमान, ‘या’ निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या

गेल्या आठवड्यातील गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची मोट बांधताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांना खूप प्रयत्न करावे लागले होते. मात्र, अनेक बैठका, चर्चेनंतर त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले होते. मंत्रीमंडळ वाटपावरूनही बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते नाराज आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!