Share

वर्धा जिल्ह्यात सर्वच उद्योगांचे शटर अप, 15 हजार कामगारांना मिळाला रोजगार

Published On: 

वर्धा : कोविड 19 मुळे संपुर्ण देशात शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी छोट्या उद्योगांसोबतच मोठे उद्योगांचे शटर सुद्धा डाऊन होते. तथापि चवथ्या लोकडाऊनमध्ये राज्य शासनाने खबरदारी घेत टप्प्याटप्प्याने एकेक क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. . याचा परिणाम रोजगारावर दिसून येत असून जिल्ह्यातील सर्वच मोठे उद्योग सुरू झाले असून छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये सुमारे 15 हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे.

“तुमचा लॉकडाउनचा एक्झिट प्लान काय ?” मनसेच्या एकमेव आमदाराचा ठाकरे सरकारला प्रश्न

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने लोकडाऊन घोषित केला. त्यामुळे जीवणावश्यक वस्तूंचे उद्योग वगळता सर्व उद्योगांना कुलूपबंद करावे लागले. यामध्ये राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमधील आणि इतरत्र असलेल्या उद्योगांचा समावेश होता. यामध्ये सॉफ्टवेअरच्या कंपन्यांनी त्यांच्या नोकरदारांना घरून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली. मात्र साहित्य उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना घरून काम करण्याची सोय करणे शक्य नसल्यामुळे अशा उद्योगांना शटर डाऊन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत टप्प्या टप्प्याने सर्व उद्योग खबरदारी घेऊन सुरू करण्यास मान्यता दिली. जिल्ह्यातही सर्वच उद्योग सुरू झाले असून परवानगी घेतलेले व परवानगी न घेतलेले उद्योगांमध्ये सुमारे 15 हजार कामगार रुजू झाले आहेत.

परवानगी घेतलेल्या मोठ्या उद्योगांमध्ये जिल्ह्यातील उत्तम गलवा मेटॅलिक्स, उत्तम गलवा व्हॅल्यू स्टील, महालक्षमी, व्हील्स इंडिया मिलिटेड, गिमाटेक्स, पी व्ही टेक्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश असून सध्या या उद्यगांमध्ये सुमारे 9हजार 625 कामगार कार्यरत आहेत. याशिवाय परवानगी न घेतलेल्या अनेक कंपन्या सुरु झाल्या असून त्यामध्ये सुद्धा 5 हजार कामगार काम करीत आहेत.

बापरे! दिल्लीत पुन्हा मोठ्या भूकंपाचे संकेत?

जिल्ह्यात परवानगी घेतलेल्या आणि न घेतलेल्या असे 95 टक्के उद्योग व कंपन्या सुरू झाल्या आहेत. या उद्योगांना लागणारा कच्चा माल इतर जिल्हा व राज्यातून आणण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच जिल्ह्यात उत्पादित झालेले उत्पादन बाहेर पाठविण्यास सुद्धा कोणतीही अडचण येत नसल्याचे औद्योगिक महामंडळाचर जिल्हाअध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!