🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे आले त्यापैकी सर्वात महत्वाचं नाव म्हणजे उद्योगपती रतन टाटा. करोनाच्या लढाईत टाटा उद्योग समूहाकडून आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. समूहाने १५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.
कोरोना आजारामुळं मानव जातीसमोर सर्वात मोठ संकट आलं आहे. परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे देशासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत टाटा ट्रस्टने ५०० कोटी रूपये मदत म्हणून देत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय, मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
दरम्यान,टाटा यांनी दाखवलेल्या दानशूरपणामुळे भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, असा ठराव गुरुवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. गुरूवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हा ठराव मांडण्यात आला होता.
कोरोना नंतर आपल्याला ‘हे’ करावचं लागेल, अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला
देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी रतन टाटा हे मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. टाटा मोटर्स हा पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा मोठा उद्योग समूह आहे. त्यामुळे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी शिफारस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केंद्र सरकारला केली आहे.रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा ठराव उपसूचनेद्वारे करण्यात आला. या उपसूचनेला एकमताने मान्यता देण्यात आली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

