Share

युद्ध जिंकणारच : आतापर्यंत राज्यात ३० हजार १०८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे : ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १).

निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत.

चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई करणार – वर्षा गायकवाड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!