🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – अनेकवेळा कंपनीमध्ये काम करत असताना कर्मचारी बॉस किव्हा दुसऱ्या कारणाने वैतागलेले असतात. असे कर्मचारी काम सोडत असताना अस काही करतात कि संबंधित कंपनीला त्याचा फटका बसतो. याचच उदाहरण सध्या पहायला मिळत आहे, आणि याचा फटका बसलाय ते सर्वात मोठी सोशल साईट असलेल्या ट्विटरला.
झाल अस कि ,ट्विटरमधील एका कर्मचाऱ्याने आपल्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी थेट जगातील सर्वात ताकदवर नेते असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंच यांचं @realDonaldTrump हे ट्विटर अकाऊंट बंद करुन टाकलं. हि गोष्ठ लक्षात येताच ट्विटरने चौकशी केली. प्रथम दर्शनी हे कर्मचाऱ्याच्या चुकीने झाल्याच दिसून आलं मात्र शेवटी चौकशीदरम्यान ट्विटरच्या कस्टमर सपोर्टमधील कर्मचाऱ्याने हा खोडसाळ पणा केल्याच उघड झाल आहे. ज्याने बंद केलं त्याचा शेवटचा दिवस होता, असं या पत्रकात म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
