टीम महाराष्ट्र देशा – पुण्याच्या पूजा घाटकरने राष्ट्रकूल नेमबाजी स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय.10 मीटर एअर रायफल गटात पूजाने ही अभिमानास्पद कामगिरी केली. यावेळी पुरुष गटातही भारतीयांनी एकहाती वर्चस्व राखलंय.
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात युवा नेमबाज शाहजार रिझवी याने चमकदार कामगिरी केलीय. ओंकार सिंग आणि जीतू राय यांसारख्या कसलेल्या नेमबाजांना पिछाडीवर टाकत रिझवीने 24.7 गुणासह सुवर्णपदक पक्कं केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
