मुंबई : ठाकरे सरकारविरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चांगलेचं ताशेरे ओढले. तर राज्य केंद्राच्या परवानगीनुसार जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेऊ शकतं. असे असतानाही राज्य सरकार जनतेवर एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही. एकीकडे केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय, असे फडणवीस म्हणाले.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. एबीपी माझाशी बोलताना पाटील म्हणाले की, केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते पॅकेजची मागणी करत आहेत. शिवाय केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला.
तसेच राज्य सरकार काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इतर राज्यात फिरुन यावं मग कळेल राज्यात किती काम सुरु आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेस्टिंग सुरु आहे म्हणून रुग्ण दिसत आहेत. इतर राज्यात टेस्टिंग कमी होत आहे. त्या मानाने महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !
लढाई जिंकणार : कोरोना बरे झालेल्यांची विक्रमी संख्या; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

