Share

रक्तदानासाठी पुढाकार घ्या; राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘कोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी त्याला अॅनिमिया किंवा तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणले.

ते ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर राज्यातील रक्त पुरवठा, पीपीई किट्स, मास्क यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी ब्लड बॅंक आणि पीपीई किट्स-मास्क उत्पादक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन, संपूर्ण सुरक्षितता बाळगून, फक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. त्यामुळे सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरं घ्यावी.’

दरम्यान, आठवडाभर पुरेल एवढाच रक्ताचा साठा राज्यात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनी दिली. तसेच संपूर्ण सुरक्षितता बाळगून छोटेखानी ब्लड कॅम्प घेण्याचा सल्ला मंत्र्यांनी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!