🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. स मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याकडेच साऱ्या राज्याचं लक्ष लागलं होत. काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एका बैठकीत राज्यात लॉकडाऊनचा काळ ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
टाळेबंदीच्या या अधिकृत घोषणेमध्ये मात्र हे स्वरुप नेमकं कसं असणार आहे याची अधिक स्पष्टोक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळं आता लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ग्रीन झोन मध्ये शिथिलता दिली आहे ती कायम ठेवण्यात आली असून रेड झोन मध्ये निर्बंध आहे तसेच ठेवण्यात आले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं. इतके दिवस तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात आणि करोनाशी लढा दिला. आता जे उद्योग सुरु होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे
रेड झोनमध्ये शिथिलता आणणे सध्या परवडणारे नाही
ग्रीन झोनमधील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार
आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरू; ५ लाख मजूर काम करू लागले आहेत
मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे
भूमीपुत्रांनो, ग्रीन झोनमधल्या उद्योगांमध्ये सामील व्हा
नवीन उद्योगधंद्यांना 40 हजार एकर जमीन राखून ठेवलीय
भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभा करु
मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच
लॉकडाऊन जर उठवला तर इटली, ब्राझीलमध्ये जे काही होतंय ते इथे होईल, त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही
ज्या मजुरांना पाठवलं, त्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतले नाहीत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले
जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे, आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू
इतर राज्यातील मजूर रस्त्यात का चालताय, तुमच्यासाठी आधीच ट्रेनची सोय केली आहे, तुमच्या प्रत्येकासाठी बस, ट्रेनची सोय केली आहे, ते तुमची सोय करत आहेत
मजुरांची आपण काळजी घेतली, 5-6 लाख मजुरांची जेवणा खाणाची सोय केली, त्यांना घरी जायचं होतं, त्यासाठी प्रयत्न केले, जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका
तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा
हे संकट आपल्याला परतवून लावायचं आहे, जनजीवन आपण पूर्वपदावर आणायचं आहे, पण हे सुरळीत होण्यास वेळ लागेल, आपण जेवढी खबरदारी घेऊ तेवढं लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

