Share

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की…’, अखेर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बहुप्रतीक्षित असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेचे अधिकृत आमदार झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा विधीमंडळात पार पडला. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली होती.

बिनविरोध निवडणूक व्हावी ही उद्धव ठाकरेंची इच्छा !

करोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

ठाकरे घराण्यातील दुसरे ठाकरे आमदार

उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे ठाकरे आहेत जे आज आमदार झाले आहेत. याआधी मंत्री आदित्य ठाकरे हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडून आले होते. तर आता उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर आमदार झाले आहेत. याआधी ठाकरे हे बाहेर बसूनच राजकारणाची सूत्र हाताळत होते. मात्र आता दुसरी आणि तिसरी पिढी ही प्रत्यक्ष राजकारणात उतरली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!