Share

‘वानखडे स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या क्वारंटाइन सेंटरबाबत विचार करावा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात आणि खासकरून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी ताब्यात द्यावे, अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली आहे. मात्र यावर पुनर्विचार करावा अशी मागणी मरिन ड्राईव्ह रेसिडेंट असोसिएशनने केली आहे.

याबाबतचे पत्र असोसिएशनने मुंबई पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यात असे म्हंटले आहे की, जुन्या रहिवाशी भागाच्या मध्यभागी वानखेडे स्टेडियम आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना अगोदरच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा परिसर आता ग्रीन झोनमध्ये आहे. आम्ही कठोरपणे लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले आहे. वानखेडे मैदानात क्वारंटाइन केंद्रासाठी दिल्यास आजार आमच्या दारात येईल असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

संजय राऊतांनी सुचवला दुसरा पर्याय

मुंबईची वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता वानखेडेबरोबर ब्रेबॉर्न मैदानाचा क्वारंटाइन केंद्रासाठी विचार करावा, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या ट्विटला राज्याचे मंत्री अदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, येणारा पावसाळा लक्षात घेता ज्या ठिकाणी मातीची मैदाने आहेत, असे ठिकाण क्वारंटाइन केंद्र म्हणून वापरता येणार नाही.

दरम्यान कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिके वानखडे स्टेडियममध्ये क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची तयारी केली आहे. याबाबत आयुक्तांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलेले आहे. यामध्ये वानखेडे स्टेडियमवर कोरोनव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कोविड -१९ रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा मागितली आहे. याबाबत एमसीएला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार येथे ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!