Share

‘सावकारी सरकारने आईप्रमाणे वागले पाहिजे, पैसे कर्जरुपाने न देता खात्यात जमा करा’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कॉंगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारला आर्थिक पॅकेजवर पुनर्विचार करा असे आवाहन केले आहे. कारण सध्या देशातील गरजू लोकांना पैसे कर्जरुपाने न देता पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. मात्र केंद्र सरकार सावकाराप्रमाणे वर्तन करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

यावेळी राहुल गांधींनी एका बाळाचे आणि आईचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, जेव्हा मूल रडते, आई त्याला कर्ज देत नाही, त्याला शांत करण्याचा एक उपाय शोधते आणि त्याच्यावर उपचार करते. केंद्र सरकारने देखील असेच केले पाहिजे. सरकार, विरोधी पक्ष आणि माध्यमांनी सर्वांनी एकत्र येऊन अशा लोकांसाठी काम केले पाहिजे. सरकारने सर्व बाधित लोकांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठवण्याची आवश्यकता आहे.

तसेच सरकार रेटिंग रेटिंग कमी होईलयाचा विचार करतंय. मात्र सध्या देशाच्या रेटिंग पेक्षा नागरिकांचा प्रश्न फार फोटा आहे. मला वाटते सध्या भारताबाबत विचार करा भारतातील सर्व लोक व्यवस्थित असतील तर ते पुन्हा एकत्र काम करतील आणि रेटिंग आपोआप ठीक होईल, असे राहुल गांधी म्हणाले.

लॉकडाऊन समस्येवरचा उपाय नाही

लॉकडाऊन हा कोरोनाच्या समस्येवरचा उपाय नाही. त्यामुळे आपल्याला लॉकडाऊन हळूहळू समजुतदारपणे उठवण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्व समस्यांवरचा तो उपाय नाही. आपल्याला वृद्ध आणि मुलांची काळजी घेत लॉकडाउन उठवण्याचाव विचार करावा लागेल. कोणलाही धोका निर्माण होणार नाही याचा विचार करावा लागेल.

मी पंतप्रधान असतो तर…

मी पंतप्रधान नाही, मात्र विरोधी पक्ष नेता आहे. पण मी सरकारला काही सूचना करू शकतो. त्याचप्रमाणे देशात सध्या रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कोणी घर सोडून दुसऱ्या राज्यात जातो तो कामाच्या शोधात. त्यामुळे सरकारने रोजगाराच्या मुद्द्यावर राष्ट्रीय धोरण आखले पाहिजे.

लघु उद्योगांना चालना द्या…

सरकारने लघु, मध्यम आणि दीर्घ कालावधीनुसार काम केले पाहिजे. लघु कालावधीत मागणी वाढवा. यात देशातील छोटे आणि मध्यम व्यापाऱ्यांना मदत करा. त्याना रोजगार द्या. आर्थिक मदत द्या. ज्यांना सर्वाधिक धोका आहे अशांच्या आरोग्याची काळजी घ्या. तर मध्यम कालावधीत छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना मदत करा, असे राहुल गांधी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!