Share

तळीरामांची चांदी : आता सरकार देणार घरपोच दारू

Published On: 

मुंबई : राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.सरकारी नियोजन नसल्याने शेतीमालाचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी राज्यातील नागरिक अडकून पडले आहेत. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न मोठा आहे. मात्र या सर्व प्रश्नांपेक्षा राज्य सरकारला मद्यप्राशन करणाऱ्या लोकांची जास्त काळजी असल्याचं दिसून येत आहे.

राज्य सरकारने मद्यप्रेमींसाठी आज एक आनंदाची बातमी दिली आहे. मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे. कारण राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे. मात्र, ही परवानगी फक्त दारु विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांनाच देण्यात आली आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.लॉकडाऊनदरम्यान राज्य सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. मात्र, मद्यविक्री दुकांनांबाहेर प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे अखेर राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने यासाठी काही शर्ती ठेवल्या आहेत.

अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.

डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी एक दिवस जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून ही होम डिलिव्हरीची सुविधा सुरु केला जाणार आहे.

एका बाजूला हे सुरु आहे तर दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाचं बसला आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो 5 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले आहे. सध्या कांद्याला अतिशय कमी दर मिळत आहे. किमान प्रति किलो 20 रुपये तरी दर असावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!