Share

उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडे समर्थक नाराज, फडणवीसांच्या पुतळ्याला जोडे मारले

Published On: 

पाथर्डी : विधान परिषदेसाठी भाजपकडून 4 नव्या दमाच्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवण्यात आले आहे. त्यामध्ये माजी आमदार पंकजा मुंडे यांचा देखील पत्ता कट केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप पक्ष हा निष्ठावंतांचा राहिला नसून त्यामध्ये फडणवीस यांच्यासारख्या विघ्नसंतोषी लोक आली आहेत, असा आरोप करत निषेध केला आहे.

पंकजा मुंडे समर्थक नाराज असून पाथर्डी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन करून याबाबत निषेध नोंदवला आहे. भाजपा हा आता जनसामान्याचा पक्ष राहिला नसून पक्षात फडणवीस यांच्यासारख्या विघ्नसंतोषी लोकांचे ऐकले जाते तर पक्षनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांना पायदळी तुडवले जात असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

याबाबत निषेध नोंदवत भाजपा युवा मोर्चा सदस्य प्रदेश कार्यकारिणी मुकुंद गर्जे यांनी दिला राजीनामा दिला आहे. एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारलेल्याच्या निषेधार्थ पाथर्डी येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

दरम्यान राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार यावर आता शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातचं आता भाजपकडून प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत बावनकुळे यांना डच्चू देण्यात आला आहे.

येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपला विधानसभेच्या संख्याबळानुसार मिळणार 4 जागा मिळाल्या आहेत. या 4 जागांसाठी भाजप कोणाची निवड करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने ज्येष्ठांना मागे सारत काही आयारामांना संधी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!